जेऊर प्रतिनिधी

ज्या स्त्रीने स्वराज्याचे दोन छत्रपती घडवले व अंधश्रद्धेला खतपाणी न घालता पुण्याची भूमी नांगरली त्या पुण्याला आज विद्येच माहेरघर म्हणले जाते अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशहाचे गेले पाणी भद्र कोपले

ताराराणी दिल्लीचे तख्त हालवणारे महाराणी ताराराणी तसेच ज्या मातेने सती न जाता स्वतः राज्य कारभार केला व समाजापुढ एक आदर्श निर्माण केला अशा अहिल्यादेवी होळकर, शिक्षणाची जननी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले

व सहशिक्षिका फातिमा शेख तसेच डॉ.बाबासाहेबांना त्यांच्या जिवनात सहकार्य करणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवून गौरी पूजन केले.

हयाच खऱ्या आमुच्या महालक्ष्मी असून यांचेच घरोघरी पूजन झाले पाहिजे यांचे खरे कार्य आम्हाला जिजाऊ ब्रिगेडमुळे कळाले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *