करमाळा प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या हितासाठी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी दिली आहे. आम्ही सध्या आमदार संजय मामा शिंदे यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्याबरोबरच राहणार आहे. शिंदे गटाच्या समर्थकांनी त्यांच्या सूचनेनुसार फॉर्म काढून घेतले आहे. परंतु ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. हीच नाही तर कुठलीच निवडणूक बिनविरोध होऊ नये. कारण समोरच्या व्यक्तीला आपलेही महत्त्व कळले पाहिजे. कामापुरते गोड बोलणे योग्य नाही, जनतेच्या समोर जाणेच हे योग्य आहे. जनताच ठरवणार कोण विजयी होणार ते सध्या इतर गटाचे नेते अकलूज दरबारी जात आहेत. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु जनतेच्या हितासाठी व शेतकऱ्यांचे हितासाठी ही निवडणूक लागणे आवश्यक आहे. अकलूज दरबारी जाणारे नेतेमंडळींनीही शेतकऱ्यांचा व दोन नंबर कार्यकर्त्यांचा विचार करणे आवश्यक आहे. फक्त आमदारकी डोळे समोर ठेवून दोन नंबर गटाचे नेत्यांना वाऱ्यावर सोडणे हे योग्य नाही. त्यांच्याही अपेक्षा असतात त्यांनाही पद मिळाली पाहिजे व या माध्यमातून शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे अशी माहिती सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी दिली आहे.

……………………………….

आमदार संजयमामा शिंदे यांनी निवडणूक रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आम्ही निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतलेली आहे. – सतीश शेळके (चेअरमन सावडी सोसायटी)

………………………………

स्व. नामदेवराव जगताप यांच्या काळापासून कृषी उत्पन्न बाजार समिती जगताप गटाचे नेते मा. आ. जयवंतराव जगताप यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आमचे नेते आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म माघारी घेतले आहेत. जगताप यांना बिनशर्त पाटिंबा दिला आहे. – चंद्रकांत सरडे (सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती)

………………………………………

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या कार्यकाळात कर्जमुक्त झाली आहे. 50 लाखाच्या आसपास एफडी आहे. माझ्या कार्यकाळात पारदर्शक कारभार व कर्मचाऱ्यांचे योग्य ते वेळेवर पेमेंट केले आहे. – प्रा. शिवाजीराव बंडगर (मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *