करमाळा प्रतिनिधी

जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्यावरील खड्ड्यामुळे कित्येक प्रवाशांचे प्राण गेलेले आहेत. कित्येक प्रवाशांना अपंगत्व आलेला आहे. प्रशासन अजून किती जणांचे बळी घेणार आहेत जर दोन दिवसांमध्ये रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास बळीराजा शेतकरी

संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिली. करमाळा तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था झालेली

आहे. जातेगाव ते टेंभुर्णी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे. कित्येक प्रवाशांचे या रस्त्यावर बळी गेलेले आहेत. अनेक प्रवाशांना अपंगत्व आलेला आहे प्रशासनाने या दोन दिवसांमध्ये खड्डे बुजूनघ्यावेत न घेतल्यास बळीराजा शेतकरी

संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी बनकर, आजिनाथ इरकर, निलेश पडोळे, बाळासाहेब माने, प्रकाश काळे, हनुमंत राऊत, भीमराव येडे, अनिल तेली, नवनाथ कोळेकर, भालचंद्र इवरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *