करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथे
सोनम वांगचुक यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी जनजागृती मोर्चा

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या NEET 2026 परीक्षेत मोठे गैरव्यवहार व पेपरफुटी आणि अनियमिततेच्या निषेधार्थ प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे दीर्घ उपोषण केले सुरु आहे. NEET पेपरफुटीमुळे लाखो होतकरु विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आणि त्यांच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण झाली. देशभरातून जवळपास 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.भ्रष्ट परीक्षा व्यवस्था आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पारदर्शक परीक्षा प्रणालीसाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची व दोषींवर कठक कारवाईची मागणी करत वांगचुक यांनी जंतर-मंतरवर उपोषण सुरू केले आहे.

‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या संघटनेने या आंदोलनाचे नेतृत्व केले असून, देशभरातून नागरिक व विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रदीर्घ उपोषणामुळे त्यांचे वजन वेगाने घटले व त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल मोठी चिंता व्यक्त करण्यात आली. तरी देखील अद्याप केंद्र सरकारने यावर कोणतेही पाऊल उचलले नाही. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या करमाळा तालुक्यामधील सर्व गावातील विद्यार्थी, पालक ,विविध सामाजिक, शैक्षणिक संघटना यांनी सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी कमलाभवानी मंदिर करमाळा येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन डॉ. अमोल दुरंदे व ॲड. सविता शिंदे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *