करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील पुर्व भागासाठी अतिशय वरदायिनी ठरणाऱ्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पावसाळी आवर्तनास आज सुरुवात झाली. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक डॉ. हरीदास केवारे यांच्या हस्ते कुंभेज येथील पंप हाऊस दोन मधील मोटारी कळ दाबुन सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी सभापती अतुल भाऊ पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, पाटील गटाचे युवानेते पृथ्वीराज पाटील, आदिनाथचे अभ्यासु संचालक विधीज्ञ राहुल सावंत,

बहुजन संघर्ष सेना संस्थापक तथा संचालक राजाभाऊ कदम, संचालक दत्तात्रय गव्हाणे, संचालक हनुआबा सरडे, पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, सरपंच गणेश घोरपडे (वरकटणे), माजी सरपंच संतोष आडेकर (साडे), योगेन लोंढे, आ.नारायण आबा पाटील स्वीय सहाय्यक संजय फडतरे, सोशल मीडिया तालूका मुख्य प्रसारक संजय तनपुरे, उपसरंपच संजय तोरमल (कुंभेज), गणेश शिंदे, नाना तोरमल, इन्नुस पठाण, महादेव महानवर आदि उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय राजगुरु, कनिष्ठ अभियंता विलास देवकाते यांनी स्वागत केले.

आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून चालू आवर्तन देण्यात येणार असुन पुढील भागातील तलाव, बंधारे, शेततळी, नाला बिल्डींग, ओढे आदि पाणीसाठे नियोजनात सामील आहेत. या योजनेतुन मलवडी, घोटी, वरकुटे, नेरले, साडे, आळसुंदे, निंभोरे, कोंढेज, सौंदे, फिसरे, शेलगाव क, अर्जुननगर, सरफडोह, पांडे, मसेवाडी, गुळसडी, हिसरे, देवळाली, वरकटणे, खडकेवाडी, कुंभेज, झरे, पोपळज, हजारवाडी, जेऊरवाडी, जेऊर या गावांना पाणी देण्यात येणार आहे. सदर आवर्तन हे टेल टु हेड या नियमाचा अवलंब करुन देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सर्व लाभधारकांनी पाटबंधारे विभागाकडील पाणी मागणी अर्ज भरुन द्यावेत. जिथे तांत्रिक अडचणी येतील तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी पाणी वाटप नियोजनास सहकार्य करुन पाटबंधारे विभागास अडथळे दुर करण्यास सहकार्य करावे व पाण्याचा लाभ घ्यावा. आमदार नारायण आबा पाटील यांच्या सुचनेनुसार कार्यक्षेत्रातील तसेच इतर पाणी मागणी अर्ज प्राप्त भागात पाणी पोहचवले जाईल असे उपविभागीय अधिकारी संजय राजगुरु यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *