
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगर परिषदेने त्वरित योग्य ते गणेश विसर्जनाचे नियोजन करावे अशी मागणी माजी नगरसेविका राजश्री माने यांनी केली आहे.

करमाळा शहरातील सर्व ठिकाणचे घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जन करण्यासाठी नगरपालिका जो खड्डा तयार करते तो न करता प्रांत अधिकाऱ्यांनी नगरपालिकेस करमाळा शहरातील एखादी खाजगी विहीर अधिग्रहण करून देण्यात यावी व

विसर्जन झाल्यानंतर थोड्या दिवसांनी त्या विहिरीची स्वच्छता नगरपालिके कडून करून घ्यावी. यामुळे नागरिकांच्या भावनाही दुखावल्या जाणार नाही. शहरातील काही मंडळाचे व घरगुती गणपती पाचव्या दिवशी पडतात. त्यामुळे लवकरात लवकर विहीर अधिग्रहण करून द्यावी. अशी मागणी माजी नगरसेविका राजश्री माने यांनी केली आहे.
