करमाळा प्रतिनिधी

कारखान्याच्या मशिनरीचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून ऊस तोडणीचे नियोजन झाले आहे. येणाऱ्या गाळप हंगामात चार लाख टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन असल्याची माहिती संचालक मंडळ सदस्य महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी

दिली. संचालक बेदरे यांच्या हस्ते आज कारखान्याच्या रोल पूजन करून ट्रायल घेण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना चिवटे बोलत होते. आज आदिनाथ कारखान्यावर विभागवार सर्व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. अत्यंत

कमी खर्चात यावर्षी कारखाना सुरू करण्याचे नियोजन सर्व कर्मचाऱ्यांनी केली असून संचालकांनी सुद्धा अत्यंत कमी खर्चात कारखाना सुरू करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी आदिनाथ ला पैसा कमी पडू

देणार नाही अशी भूमिका घेऊन करमाळा तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. यावर्षी सुद्धा काटा पेमेंट देऊन आदिनाथ कारखाना शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. गतवर्षी वाहतूक केलेल्या वाहन मालकांचे थकीत देणे संदर्भात निर्णय घेण्यात आला असून लवकरच पेमेंट देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

……

आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्याचे वैभव असून याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्राधान्याने आदिनाथ कारखान्याला ऊस द्यावा येणाऱ्या काळात डिसलरी प्रकल्प चालू करण्याची नियोजन असून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत व आलेगाव कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज भैय्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ कारखाना सक्षम पणे चालविणार असल्याचे प्रशासकीय संचालक महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी सांगितले.

……

ऑगस्ट महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून कर्मचाऱ्यातून याबद्दल आनंद व्यक्त होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *