
करमाळा प्रतिनिधी
उमरड येथे संपूर्ण गाव एकत्र येऊन राजकारण बाजूला ठेवून दारूबंदी कमिटी निर्माण करण्यात आलेली आहे. दारूबंदी कमिटीच्या माध्यमातून उमरड गावातील आणि गावाच्या शिवारातील दारू व जुगार पूर्ण बंद करण्यात आली आहे. दोन्ही

राजकीय पार्ट्या एकत्र आल्या असून बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी पाटील यांना निवेदन देण्यात आले. उमरड गावातील दारू व जुगार बंद झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. सदर

मागणीचा विचार करून उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांनी तत्काळ पोलिसांना आदेश देऊन उमरड गावातील दारू व जुगार बंद करण्यात आली. जेऊर पोलीस स्टेशनचे हवालदार गणेश शिंदे 21 सप्टेंबर रोजी गावातील ग्रामस्थांच्या मिटींगला

उपस्थित राहून दारू व जुगार बंद करण्याचे आश्वासन दिले. सर्व दारू विक्रेते जुगार चालवण्याची दुकाने बंद ठेवा अन्यथा तडीपारीची कायदेशीर धमकी देण्यात आली. दारूबंदी कमिटीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन हवालदार गणेश शिंदे यांनी दिले. कायमची दारू बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एक मुखाने घेतला.
या वेळी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम, ग्रामपंचायतचे सरपंच लालासाहेब पडवळे, माजी सरपंच संदिप मारकड, नंदकिशोर वोल्टे सर, माजी सरपंच बापू चोरमले, माजी सरपंच प्रमोद बदे, माजी उप सरपंच गणेश चौधरी, उपसरपंच मुकेश बदे, ग्रामपंचायत सदस्य समाधान वलटे, ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख, ग्रामपंचायत सदस्य चांगदेव चौधरी, भगवान चौधारी, प्रमोद कुलकर्णी,विनोद बदे, जनार्धन मारकड,सुनील बदे, राजू गोडगे,भाग्यवन्त बंडगर, भास्कर पडवले, दिगंबर मारकड, आदी शेकडो ग्रामस्थ उपस्तीथ होते.