
करमाळा प्रतिनिधी
दि. 13 सप्टेंबर बुधवार रोजी क्रीडा व युवक सेवक संचालनालय अंतर्गत ज़िल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर व बहूउद्देशीय प्रशाला कडलास, तालूका सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने ज़िल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धा याठिकाणी

पार पडल्या. या ज़िल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत ज़िल्हातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता. यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या 19 वर्षाखालील वयोगट मुलांच्या अक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक या प्रकारात गोरक्ष लोंढे

याने प्रथम व समाधान क्षीरसागर याने द्वितीय क्रमांक तर अनिकेत करे याने तृतीय क्रमांक मिळवला. वरील विजयी खेळाडूंची पुणे विभागीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, करमाळा तालुका क्रीडा समन्वयक, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.राम काळे व सागर शिरस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे (सर), संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
