करमाळा प्रतिनिधी

भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे मध्ये 14 सप्टेंबर हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे मुलांच्या मध्ये हिंदी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे व मुलांना हिंदी भाषा

शिकण्यास प्रवृत्त करणे हा होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती बिले स्वतः उपस्थित होत्या. त्यांनी हिंदी भाषेचे मुलांना महत्त्व पटवून देताना असे सांगितले की “आपल्या सर्वांना माहिती आहे हिंदी

भाषा ही राष्ट्रभाषा आहे आणि अशी कोणतीही भाषा जर आपण जतन केली तर त्याच्यामुळे फक्त भाषाचं राहत नाही तर आपली संस्कृती,  इतिहास या सर्व गोष्टी जतन होतात.” या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांनी सहभाग

घेतला. मुलांनी हिंदीच्या कविता सादर केल्या, पोस्टर बनवून आणले होते, भाषणे केली. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख नफीसा घोडके यांनी केले व त्यांनी मुलांना हिंदीचे महान कवी संत कबीर चे दोहे, प्रेमचंद यांच्या कविता

ऐकवल्या आणि हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडला. आभार नम्रता साळुंखे यांनी मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *