
केम प्रतिनिधी
गोमाता मंदिर केम गोसेवक परमेश्वर तळेकर यांचा आज बैलपोळा संपन्न झाला. लहान मोठ्या 22 गायी व वासरे. गाय वाचवा देश वाचवा. भारतीय शेतीचे सुत्र देशी गाईचे शेणगोमुत्र. बैल हा शेती साठी एक नंबर काम करतो. शेती त्याच्या

श्वासातुन सुपीक बनवतो. सध्या आधुनिक विज्ञानाच्या आधारावर प्रगत झालेले यंत्रणा शेतीसाठी नुकसान कारक आहेत. ट्रक्टर प्रदुषण सोडतो व जमीन कडक बनवतो. आज शेतीचा उत्पादन खर्च वाढत चालला आहे व उत्पादन घटत चालले आहे.

शेती टिकवायची व पिकवायची असेल तर देशी गायी शिवाय पर्याय नाही. बैल जेवढे रूपयाचे खातो तेवढे रूपयाचे खत रूपाने परत करतो.

