
करमाळा प्रतिनिधी
देशसेवा बजावत असताना समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले शेलगाव येथील जवान दत्तात्रय महामुनी सध्या राजस्थान येथे आपल्या कर्तव्यावर कार्यरत असताना देखील देशसेवा बजावत मारकड वस्ती केंद्र चिखलठाण ता. करमाळा शाळेतील

विद्यार्थिनींनी देशाच्या सीमेवर पाठवलेल्या राख्या बद्दल धन्यवाद व्यक्त करीत सर्व विद्यार्थिनींना दप्तर भेट देण्यात आले. यावेळी गणेश मारकड, रोहित गव्हाणे, शिवाजी साळुंखे, संदीप चोबे, रोहित मारकड, प्रताप चौबे उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब जगताप यांनी सैनिकांविषयी अधिक माहिती सांगितली तर स्वाती पाटील यांनी आभार मानले.


