करमाळा प्रतिनिधी

मांगी तलाव कुकडीमध्ये वर्ग करण्यासाठी व सध्या तलवात पाणी सोडण्यासाठी माढा लोकसभेचे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक काल सिंचन भवन पुणे येथे संपन्न झाली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सोलापूर DPDC सदस्य गणेश चिवटे यांनी दिली.

आवर्षणाच्या स्थितीत मांगी तलावात कुकडीचे पाणी त्वरित सोडा अशी मागणी गणेश चिवटे यांनी यावेळी कुकडीचे प्रमुख अधिकारी कपोले यांच्याकडे केली आहे. यावेळी आवर्षन व मांगी तलाव कुकडीमध्ये विलीन करण्यासंदर्भात महत्वपूर्ण व सकारात्मक चर्चा झाली. याविषयी अधिक बोलताना चिवटे म्हणाले की, करमाळा तालुका हा कुकडी प्रकल्पच्या टेलच्या

भागामध्ये असल्याने पूर्ण क्षमतेने करमाळा तालुक्याला कुकडीचे पाणी मिळत नाही. यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे, या दुष्काळी स्थितीत जनावरे, फळबाग,जनावराचा चारा यासाठी मांगी व इतर तलावात आवश्यक पाणी लवकरात लवकर सोडण्याची गरज आहे ही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कृष्णा खोऱ्याचे प्रमुख अधिकारी कपोले यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल असे अश्वस्त केले.

मांगी तलाव कुकडीमध्ये समाविष्ट करण्यासाठी फेरजलनियोजन प्रस्ताव अंतिम टप्प्यात असलेचे त्यांनी सांगितले असल्याचे चिवटे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष पै.रामभाऊ ढाणे,सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे व सिंचन भवन चे अधिकारी आदी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *