करमाळा प्रतिनिधी

उमरड येथे अवैद्य दारू विक्री पोलिसांच्या सहकार्याने होत आहे. त्यामुळे गावातील अनेकांची संसार धुळीला मिळाले असून दारू विक्रीमुळे गावातील दहा जणांचे प्राण गेले असून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. अनेक वेळा सांगून प्रयत्न करूनही

गावातील दारू विक्री बंद होत नाही. ही खुलेआम दारू विक्री तात्काळ बंद करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात गावातील रणरागिनी महिला ग्राम संघाने दिला आहे.

या संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरड गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री खुलेआम पणे चालू आहे. या दारू विक्रीमुळे दारुडे दारू पिऊन गावात शिवीगाळ करणे, भांडण करणे व नाहक त्रास देणे असे प्रकार करत आहेत.

तसेच या दारू विक्रीमुळे जवळपास गावातील दहा जणांचा प्राण गेला आहे. तसेच अनेक कुटुंबातील व्यक्ती व मुले ही दारू पिऊन बिघडली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या दारू विक्रेतांना वारंवारार सांगूनही ते दारू विक्री बंद करत नाहीत. याबाबत ग्रामपंचायतिने 28 जून 2023 रोजी ग्रामसभा घेऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला आहे. तरीही खुलेआम दारू विक्री चालू आहे. पोलिसांच्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे हे दारू विक्रेते कोणालाही जुमानत नाहीत, असा आरोप रणरागिणी महिला ग्राम संघाने व गावातील अनेक महिलांनी केला आहे. ही दारू विक्री तात्काळ थांबवावी अन्यथा कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा रणरागिनी महिला ग्राम संघ व ग्रामस्थांनी दिला आहे.

करमाळा पोलीस स्टेशनला निवेदनन देण्यासाठी आज (ता. 4) सुमन पांडुरंग शिंदे, पल्लवी नितीन कदम, कांता विक्रम कदम, निलावती अर्जुन शिंदे, फुलाबाई अभिमान कदम, कल्पना नितीन कदम, छाया टिळक शिंदे या महिला गेल्या होत्या. सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्या निवेदन स्वीकारले नाही. या निवेदनावर रणरागिणी महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा वैशाली दीपक चौधरी, सचिव धनश्री चंद्रशेखर पाटील व कोषाध्यक्षा सुरेखा वसंत वलटे यांच्यासह हिराबाई भाऊराव पवार, शोभा दशरथ पडवळे, कांता विक्रम कदम, लक्ष्मी गायकवाड, सोनाली मल्हारी कोठावळे, वत्सला सुरवसे, उषा सुरवसे, रंजना पाखरे, विद्या इंगळे, मंगल सुरवसे, प्रियंका चौधरी, भारती पाखरे, रेश्मा प्रशांत बदे, पल्लवी कदम, रंजना पाखरे, सुनीता भोसले, मंदा पाखरे, अंकिता भोसले, आदि महिलांच्या सह्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *