
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचा अभिमान प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी निखिल चांदगुडे यांच्या छोटू महाराज फिल्म टाॅकीजला भेट दिली. यावेळी नागराज मंजुळे यांचे स्वागत छोटू महाराज फिल्म टाॅकीजचे मालक चांदगुडे यांनी केले होते.

बापल्योक चे प्रमोशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंजळे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला होता. व पिच्चर संदर्भात योग्य ती माहिती दिली होती.

यावेळी नागेश झांजुर्णे, नवा रणदिवे, तालुक्यातील पिक्चर बघायला आलेले मंडळी, टॉकीज वरील सर्व कर्मचारी हे उपस्थित होते.

