करमाळा प्रतिनिधी  

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील व उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार

महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती तालुकास्तरीय पावसाळी मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हाचे वित्त लेख अधिकारी व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय माजी विद्यार्थी दयानंद कोकरे यांनी सदिच्छा

भेट दिली. याप्रसंगी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की खडतर, परिश्रम, जिद्द, चिकाटी व प्रयत्न केल्यास जीवनात उत्तुंग यश मिळवता येते. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या विद्यार्थी दशेतील अनुभव सांगितले व या

महाविद्यालयामुळेच मी अधिकारी होऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे हे त्यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी आपले मनोगत करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्य मिलिंद फंड यांच्या हस्ते दयानंद कोकरे यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मण राख यांनी केले तर आभार क्रीडाशिक्षक प्रा. रामकुमार काळे यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व तालुक्यातील सर्व विद्यालयाचे क्रीडाशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *