आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
करमाळा प्रतिनिधी
पाऊस लांबल्यामुळे तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परस्थितीमुळे आमदार संजयमामा शिंदे यांनी तहसील
कार्यालयात सर्व अधिकार्यांची टंचाई आढावा बैठक घेतली आहे. यावेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, समाधान घुटुकडे, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, कृषी अधिकारी संजय वाकडे, प्रभारी गटविकास
अधिकारी राजाराम भोंग, मंडळ अधिकारी संतोष गोसावी, उध्दव माळी, वामनराव बदे, महेश चीवटे, राजेंद्र पवार, विवेक येवले, सुजित बागल, अॅड. राहुल सावंत आदी उपस्थित आहेत.
आमदार शिंदे यांनी यावेळी पाणी टंचाई व चार्याबाबत नियोजन करण्याची सूचना केली आहे. शेतकर्यांना मदत करण्याबाबतही नियोजन करण्याची चर्चा यावेळी झाली.