करमाळा प्रतिनिधी
करमाळा पोलिस ठाणे अत्याधुनिक होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी दहा संगणक व सहा प्रिंटर दिले आहेत. याचे उदघाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते झाले आहे. आ. संजयमामा शिंदे यांनी आमदार निधीतून हे
संगणक दिले आहेत. करमाळा पोलिस ठाण्यास संगणकाची गरज होती. उदघाटना वेळी आमदार संजयमामा शिंदे, प्रांताधिकारी प्रियंका अंबेकर, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, अॅड. राहुल सावंत आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक गुंजवटे यांच्या कक्षात संगणकाला पुष्पहार घालून हे उदघाटन झाले.