करमाळा प्रतिनिधी

तालुक्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांच्या हिताच्या शासकीय योजना चालू कराव्यात अशी मागणी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे यांनी केली आहे.

करमाळा तालुक्यातील पूर्व भागात तसेच उत्तर भागात खूप पाण्याची टंचाई जाणवत आहे. पिण्यासाठी शेतकरी जनावरे वाड्यावर भटकंती करत आहेत, परंतु कोरड्या विहिरी तसेच पाणीपातळी खाली गेल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी संकट

निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाने ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा. तसेच तालुक्यात चारा छावणी पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी पाण्याचे टँकर चालू करावे. तहसीलदार नसल्यामुळे ठोस असे निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकारी नाही,

यामुळे तालुक्यातील शेतकरी सामान्य नागरिकांना अडचणी निर्माण होत आहे. निर्णय त्यांना घेता येत नाही तरी तहसीलदार पदी लवकरात लवकर सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. अन्यथा शेतकरी व पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी दिला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *