
करमाळा एमआयडीसीसाठी उजनी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा प्रस्ताव सादर करा उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आदेश
करमाळा प्रतिनिधी

करमाळा एमआयडीसीसाठी उजनी धरणातून 28 किलोमीटर अंतराची पाईपलाईन करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करा असा आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुंबई येथील मुक्तागिरी या निवासस्थानी उद्योग मंत्री सामंत यांची भेट घेऊन करमाळा एमआयडीसी बाबतचे प्रश्न मांडले.

करमाळा एमआयडीसीसाठी 147 हेक्टर जमीन भूसंपादन झाले असून या जमिनीमध्ये प्लॉटिंग व रस्ते आधी विकास कामे झाली आहेत. मात्र यातील उद्योजकांना पाण्याची व्यवस्था येत नसल्यामुळे उद्योजक येत नाहीत. यामुळे करमाळा एमआयडीसीसाठी उजनी धरणावरून तात्काळ स्वतंत्र नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करावी अशी मागणी महेश चिवटे यांनी

केली होती.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करा. असा आदेश उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांना दिला असून याचा सर्वे सोलापूर विभागाचे श्रीनगर करणार आहेत.

एमआयडीसी मध्ये पाणी उपलब्ध झाले तर मोठे मोठे उद्योग येऊन करमाळा तालुक्यातील जवळपास चार ते पाच हजार तरुणांच्या हाताला काम मिळेल यासाठी आपण प्रयत्नशील असून ही पाणीपुरवठा योजना मंजूर करून सुरू करण्याचा शब्द उदय सामंत यांनी दिला असल्याची माहिती जिल्हाप्रमुख यांनी दिली.
