
चंद्रयान 3 यशस्वी मोहिमेचा दत्तकला शिक्षण संस्थेत आनंदोत्सव साजरा
करमाळा प्रतिनिधी
आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व दत्तकला सीबीएसई स्कूल मधील

विद्यार्थ्यांना चांद्रयान मोहिमेची सर्व माहिती संबंधित विषय शिक्षकांनी दिली. दत्तकला शिक्षण संस्थेच्या ऑडिटोरियम हॉल मध्ये मोठ्या स्क्रीन वरती विद्यार्थ्यांना चांद्रयान तीन मोहिमेचे प्रेक्षपण दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कुल

विभागाच्या डायरेक्टर प्राचार्या नंदा ताटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना वैज्ञानिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी सांगितले. प्राचार्या सिंधू यादव यांनी आपल्या भाषणात विज्ञान शिक्षणाचे महत्व सांगितले. प्रा.शीतल खोमणे

यांनी चंद्रयान 3 चे वर्णन शाळेत बनवलेल्या प्रतिकृतीच्या माध्यमातून सांगितले.
प्रा.मयुरी कदम यांनी मुलांना चंद्रयान 3 चे अंतर्गत घटकांचे विश्र्लेशन करून मार्गदर्शन केले. मुलांच्या हस्ते केक कटिंग केला गेला.कॉलेज विभाग प्रमुख प्रा.धर्मेंद्र धेंडे माध्यमिक विभाग प्रमुख प्रा.संगीता खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्योती झोरे यांनी केले.
दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.
