
करमाळा प्रतिनिधी
सवाई गंधर्व महोत्सवा प्रमाणेच सुरताल संगीत नृत्य महोत्सवालाही करमाळा तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात मानाचा स्थान निर्माण करण्याचं काम सूरताल संगीत विद्यालयाकडून होत आहे. विविध राज्यातील गायक आणि नृत्यकार यांनी

आपली कला सादर करून करमाळ्याचे नाव उत्तुंग शिखरावर पोहोचविण्याचे काम केले आहे. असे मत यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

कमला भवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालय करमाळा यांच्या वतीने पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर व पंडित के. एन. बोळंगे गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात येणारा सुरताल संगीत नृत्य महोत्सव करमाळा संगीत रसिक

पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे तर प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील, विद्या विकास मंडळाचे

अध्यक्ष मिलिंद फंड, मिस युनिव्हर्सल डॉ. प्रचिती पुंडे, विस्ताधिकारी सुग्रीव नीळ, शिक्षण मंडळ सदस्य महादेव फंड, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाजीक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर यांना संस्थेच्या वतीने मानाचा “करमाळा संगीत रसिक”

पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यश कल्याणी संस्थेच्या वतीने सूरताल संगीत विद्यालयास स्मार्ट टीव्ही देण्यात आला. आलेल्या कलाकारांना सुरताल संगीता विद्यालय व यशकल्याणी संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भक्ती गीत व बालगीत गाऊन श्रुतींची मने जिंकली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शास्त्रीय गायिका परामिता राॅय कोलकत्ता, मणिपुरी नृत्यांगणा कुहेलीका बसू कोलकत्ता, कत्थक नृत्यांगना मौमिता चक्रवर्ती सिलिगुडी, ओडिसी नृत्यांगना सुजाता नायक कोलकाता, सत्रिय नृत्यांगना मंजूमनी बोराह गुवाहाटी, कुचीपुडी नृत्यांगना तेजस्विनी कलगा हैदराबाद, भरतनाट्यम नृत्यांगना सुदीपा सैन सिल कोलकत्ता, कथक नृत्यांगना डॉ. अर्पिता चॅटर्जी कोलकत्ता यांनी आपली कला सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापिका मुक्ता काटवटे, प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब नरारे तर आभार दत्ता जाधव यांनी मानले.