
जेआरडी माझा
जाहीर आवाहन सोलापूर जिल्ह्य़ातील व शहरातील नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12-00 वा. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिध्देश्वर मंदिर जवळ सोलापूर येथे विर कोतवाल

शिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे. इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी मध्ये सर्व शाखेतून 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थां मधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास, अनुक्रमे रुपये 3001, 2501, 1501 रोख बक्षीस

व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक वगळून 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये 500/- रोख बक्षीस देण्यात येणार आहेत.

सन 2023 मध्ये पदवी-पदव्युत्तर मध्ये 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. नाभिक समाजातील पितृत्व हरवलेल्या गरीब कुटुंबातील इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे दानशूर व्यक्तींच्या मदतीने पालकत्व स्वीकारून त्यांना शैक्षणिक मदत म्हणून रुपये 3000/- अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.

तरी वरील निकष पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिका दिनांक 10/9/2023 पूर्वी खालील व्यवस्थापना कडे पाठवाव्यात ही विनंती.
हे आवाहन समाजाच्या सर्व ग्रुपवर पाठवावे आशी विनंती आहे. असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. यासाठी संपर्क वीर कोतवाल शिक्षण संस्था, सोलापूर, करमाळा प्रतिनिधी – राजू चंद्रकांत दळवी
संपर्क राजू चंद्रकांत दळवी, करमाळा – 9604892740 करावा
