जिल्हास्तरीय १९ वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेसाठी दत्तकला आयडियल स्कूल अॅन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ च्या मुलींची निवड

करमाळा प्रतिनिधी

गौंडरे या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२३-२०२४ या स्पर्धेत दत्तकला आयडियल स्कूल अॅन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्यात अंतिम सामना झाला. दत्तकला

आयडियल स्कूलच्या खेळाडूंनी ५ गुणासह अंतिम सामना जिंकून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड प्राप्त केली. 

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ सर, उपअध्यक्ष राणा (दादा) सुर्यवंशी सचिवा माया झोळ मॅडम, मुख्य

प्रशासकीय अधिकारी डॉ.विशाल बाबर सर, स्कूल डायरेक्टर नंदा ताटे मॅडम, स्कूलचे प्राचार्य विजय मारकड सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *