
करमाळा प्रतिनिधी
दिनांक – 18,19,20 ऑगस्ट रोजी ज़िल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा भारत हायस्कूल जेऊर येथे पार पडल्या. करमाळा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी

सहभाग नोंदवला होता. त्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा खेळाडू पैलवान गोरक्ष लोंढे याने 19 वर्षाखालील मुलांच्या 57 किलो वजनी गटात सहभागी झाला. भरपूर अटीतटीच्या सामन्यातून पैलवान गोरक्ष लोंढे अंतिम फेरीत मध्ये प्रवेश केला.

पैलवान गोरक्ष लोंढे याने अंतिम सामना जिंकून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून ज़िल्हा कुस्ती स्पर्धेत निवड झाली. तसेच खेळाडू पैलवान सचिन बंडू बागडे याने 19 वर्षाखालील मुलांच्या ग्रिको रोमन या प्रकारात 60 किलो वजन गटात सहभागी

होऊन अंतिम फेरीत प्रवेश केला आणि सचिन बंडू बागडे यांनी अंतिम सामन्यात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली. तसेच कुमारी पुजा पिंटू पवार 17वर्ष वयोगट- 53 किलो वजनगटामध्ये तालुक्यात प्रथम

क्रमांक मिळवून जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंना उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, क्रीडा शिक्षक प्रा. राम काळे व प्रा. दिपक ठोसर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

पैलवान गोरक्ष लोंढे, पैलवान सचिन बंडू बागडे व कुमारी पुजा पिंटू पवार या सर्वांचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे डॉ. एल.बी. पाटील, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापकांनी कौतुक करून अभिनंदन केले व जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.