करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यामध्ये चारा छावण्या ताबडतोब चालू करण्यात यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचेसोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिने झाले परंतु समाधानकारक

पाऊस नसल्यामुळे खरीप पेरण्या झालेल्या आहेत. पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पिके जळू लागले आहेत. जनावरांना चारा उपलब्ध नसल्यामुळे जानवारे शेतकरी कसा याला विकू लागलेला आहे. पशुधन कमी होऊ लागला

आहे. महाराष्ट्र शासनाने ताबडतोब चारा छावण्या सुरू कराव्यात. शेतकऱ्यांना पिक विम्याची पैसे ताबडतोब खात्यावर जमा करण्यात यावी. शेतामध्ये बी बियाणे पेरण्यासाठी सावकाराकडून पैसे घेऊन खरिपाची पेरणी केली आहे. करमाळा

तालुक्यातील साखर सम्राटांनी शेतकऱ्यांची अजून उसाची बिले दिलेली नाही त्यामुळे शेतकरी मेटा कुठीला आलेला आहे. शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. आई जीव घालीन बाप भीक मागू देईना अशा पद्धतीची

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे. करमाळा तालुक्याला कोणी वालीच राहिला नाही, करमाळा तालुक्याला पूर्ण वेळ तहसीलदार नाही, गट विकास अधिकारी नाही, महावितरण कंपनीचा अभियंता नाही, सहाय्यक निबंध

उपलब्ध नाही करमाळा तालुक्यातील कारभार हा राम भरोसे चाललेला आहे जर आठ दिवसांमध्ये करमाळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून व चाऱ्या छावण्या चालू न झाल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने किंवा स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा सुपनवर यांनी दिला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी बनकर, आजिनाथ इरकर, निलेश पडवळे, दादासाहेब महानवर, गणेश गलांडे, समाधान मारकड, नवनाथ कोळेकर, बाळासाहेब माने, प्रकाश काळे, अभिजीत सस्ते, देविदास तळेकर, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *