
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील चिमाजी मिरगळ वस्ती ते हिवरवाडी वडगाव रोड एक किलोमीटर, वाशिंबे गाव ते भैरवनाथ मंदिर एक किलोमीटर, देवळाली गाव ते गुंड भांडाळे वस्ती 1 किलोमीटर, सांगवी एक ते बिटरगाव रोड एक किलोमीटर या पद्धतीने

मातोश्री ग्राम ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ता योजनेअंतर्गत मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून या कामाला मंजुरी मिळाली असून या रस्त्यासाठी किमान दीड कोटी रुपये खर्च होणार आहे. 5 /95 या योजनेद्वारे काम मंजूर झाली आहेत

याबाबत बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, मातोश्री पानंद रस्ते माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आनंद रस्ते करण्यासाठी रस्त्याची वाद संपुष्टात आणून हे रस्ते तयार करून घ्यावेत.

प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचा पाठपुरावा कामी आला.
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी या कामाची शिफारस करून नामदार संदीपान भुमरे यांच्याकडूनही कामे केल्याबद्दल करमाळा शिवसेनेच्या वतीने प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

