करमाळा प्रतिनिधी

येथील कमलादेवी कन्या विद्यालयात यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थिनींनी प्रभात फेरी, देशभक्तीपर गीते, खाऊ वाटप इत्यादीचा समावेश होता. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे

संचालक घनश्याम गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  शेवगाव जि. अहमदनगर येथील लेखापरीक्षक सहकारी संस्था माणिकराव सोनटक्के  व प्रगत माध्य. व उच्च माध्य. विद्यालय नवी पेठ, अहमदनगर

येथील प्रयोग सहाय्यक कल्पना  खांदाट  या उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापिका मुक्ता शेलार यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक गणेश चिवटे, महेश परदेशी, प्रवीण गायकवाड, शामराव पुराणिक,

सुनील सूर्यपुजारी, इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट शिंदे सर यांनी केले. तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित सीताबाई भगवान परदेशी शाळेत संस्थेचे संचालक महेश परदेशी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक सुनिल सुर्यपुजारी, घनशाम गांधी, प्रवीण गायकवाड उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *