
करमाळा प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सालाबादप्रमाणे करमाळ्यात तिरंगा बाईक रॅली भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न झाली.

गायकवाड चौकातून किल्लाविभाग-वेताळपेठ-फुलसौंदर चौक-मेन रोड-जय महाराष्ट्र चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक -सुभाष चौक-संगम चौकातुन पुणे रोड ने पुन्हा भाजपा कार्यालय येथे या रॅलीची सांगता झाली. रॅली सुरवात सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून झाली.



