आंतरराष्ट्रीय स्तरावर- मुथा अबॅकस अकॅडमी ची गरुड भरारी

करमाळा प्रतिनिधी

29 जुलै व 30 जुलै रोजी झालेल्या ऑरिस्टो किड्स अंतर्गत अबॅकस व वैदिक मॅथ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करमाळा येथील नावाजलेली व यशाची उज्वल परंपरा कायम ठेवणारी मुथा अबॅकस अकॅडमी मधून 73 विद्यार्थ्यांचा  (विविध लेव्हल्स मधून)

सहभाग नोंदवलेला होता. या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सात मिनिटात 100 अचूक गणिते सोडवणे आणि अनिवार्य होते. या परीक्षेचा सराव होण्यासाठी अनलिमिटेड मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात आलेल्या होत्या. या संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी भरपूर प्रयत्न व मेहनत घेऊन यशाची उंची गाठली .

या परीक्षेचा अंतिम निकाल 13 ऑगस्ट रोजी यश कल्याणी सेवाभावी सदन येथे ऑनलाइन झूम या प्लॅटफॉर्म वरती सर्व पालक व विद्यार्थी यांच्या समवेत घोषित झाला. यावेळी 25 देशातून विद्यार्थी या परीक्षेसाठी सहभागी होते व एकूण 

राज्यातून 350 अकॅडमी मधूनही विद्यार्थी सहभागी होते.

सर्वात जास्त बक्षिसे मिळवणारी करमाळा येथील मुथा अबॅकस अकॅडमी चे विशेष कौतुकही करण्यात आले. अबॅकस हा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवणारा कोर्स आहे. यामधून विद्यार्थ्यांची शालेय अभ्यासात सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती होते. व गणित हा विषय त्यांना अत्यंत सोपा जातो व कमी वेळेत अचूक उत्तरे विद्यार्थ्यांना काढण्यास मदत होते. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये गणिते सोडवण्याच्या वेळेचीही बचत होते. यावेळी असे ज्योती मुथा यांनी सांगितले.

यशस्वी विद्यार्थी abacus

1st ,2nd,3Rd विद्यार्थी

-आदित्य सुहास कापसे, हर्ष पुष्कराज शहा , सार्थक मकरंद वनारसे

जोया सईद शेख, खुशी पुष्कराज शहा, प्रथमेश महेश घाडगे, सृष्टी कामटे जैद सईद शेख, समीक्षा महेश थोरे, शरयू  रघुनाथ फरतडे, ओम राजकुमार खाडे, सई विनोद पडवळे, अथर्व हितेश शहा, विश्वजीत गणेश कामटे, हर्षल धीरज सोळंकी, तनिष विजय तळेकर

 वेदिक maths

1St rank

आदित्य अजित सोनी, हर्षवर्धन ओहोळ , सार्थक वनारसे, आदित्य कापसे, हर्ष शहा, प्रथमेश घाडगे

शायनिंग स्टार अवॉर्ड्स

यश नरेश शहा, सादिया अनिस बागवान, जानवी गितेश लोकरे संग्राम शिवाजी लावंड, स्वप्निल कुदळे, साई सागर काळे, नीरज प्रदीप सागडे, प्रगती नानासाहेब देशमुख, कृष्णा नानासाहेब देशमुख, धूर्वी खटके, आदिल अशपाक शेख, श्रेयस सुजय पवार, मेधा दिनेश मुथा, आर्यन शामराज कापसे

बेस्ट परफॉर्मन्स अवार्ड

आर्या शैलेश फंड, श्रावणी महेश गवळी, हिबा असलम कबीर, महेक अमित नहार, स्पंदन बापू घरबुडे

इतर सहभागी विद्यार्थी

समर्थ तानाजी शिंदे, आर्यन अंकुश रोकडे, गिरीशा मुथा, जयदेव भिंगारे, मनस्वी पोतदार, ओजस गांधी, स्वराज सुनील जाधव, अभिराज माने

या सर्व विद्यार्थ्यांना मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण सोहळा यश कल्याणी सेवाभावी सदन येथे ट्रॉफी मिळाल्यानंतर त्यांना सर्वांना देण्यात येणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *