
करमाळा प्रतिनिधी
रावगाव येथील युवक हरिभाऊ सोलंकर याची पुणे शहर पोलीस पदावर निवड झाली असून पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगांव चा तो सन-2014-2015 एस.एस.सी. बॅचचा विद्यार्थी आहे. आज या बॅचचे सर्व मिञमंडळी एकञ येऊन त्यानी

हरिभाऊ चा यथोचित सत्कार वाचनालयात आयोजित केला. हरिभाऊ याने बारामती येथील सह्याद्री अकादमीत प्रशिक्षण घेतले आहे. घरची परस्थिती नाजूक असतानाही या परिस्थितीवर मात करून त्याने हे यश मिळविले आहे. या वेळी विपुल

बरडे, अतुल पवार, ललित बुधवंत, पवन पाटील, ऋषिकेश मोरे, रविराज बरडे, गणेश फुंदे, सनी पवार, विनोद बरडे, संकेत शिंदे, रवी बरडे, किरण फुंदे, किरण पवार, अनिस शेख, अथर्व बरडे, आकाश पवार, कृष्णा पवार, विकास पवार, राहूल पवार, ओंकार

पवार, गोविंद पवार, प्रकाश कांबळे, प्रशांत शिंदे, भास्कर पवार, सुभाष कांबळे, नितीन मोडके, राहुल गोसावी, आदि उपस्थित होते.

