
कुंभेज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवार वस्ती येथे १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
करमाळा प्रतिनिधी
कुंभेज येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवार वस्ती येथे १५ आॅगस्ट २०२३ रोजी 77 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिभीषण पवार होते प्रथम प्रभातफेरी काढण्यात आली,

त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील मुख्याध्यापक उबाळे सर यांनी केले, यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे कवायत, भाषणे, अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांचे बालगीत साजर करण्यात आले, त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली, शाळेची व अंगणवाडीची प्रगती पाहून वस्ती वरिल

नागरिकांनी शाळेतील शिक्षक व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सन्मान करण्यात आले, तसेच अंगणवाडीस नेहमी सहकार्य करत असलेले युवा नेतृत्व तसेच ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सुर्वे यांचा अंगणवाडी च्या वतीने शाल श्रीफळ देवुन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पवार वस्ती गणेश तरुण मंडळाने साऊंड सर्व्हिस उपलब्ध करुन दिल्याबद्दल शाळेतील शिक्षकांनी त्यांचे आभार मानले, यावेळी उपस्थित

मान्यवर , ग्रामपंचायत सदस्य, युवा धडाडीचे नेतृत्व गुरुदास सुर्वे, नितिन भोसले, चेअरमन भारत पवार, सौदागर सुर्वे, गणीभाई पठाण, बाबासाहेब तोरमल, तात्या मिसाळ, बापु पवार, लाला तोरमल, श्रीधर पवार, रामेश्वर पवार, सोमनाथ मुटके, बिभीषण पवार, अर्जुन पवार, ज्ञानदेव गायकवाड, कर्मवीर मोरतळे, शाळेतील मुख्याध्यापक उबाळे सर, सहशिक्षक झिंजाडे

सर,अंगणवाडी सेविका आशाताई चांदणे, मदतनिस मंगल शिंदे, स्वाती शिंदे व वस्ती वरिल सर्व महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उबाळे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार झिंजाडे सर यांनी मानले व कार्यक्रम उत्कृष्ट व उत्साही वातावरणात संपन्न झाला.
