
करणाळा प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वाशिंबे ता. करमाळा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना आरोचे शुद्ध पाणी मोफत देण्याचा निर्णय सरपंच तानाजी झोळ, उपसरपंच अमोल पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थिती मध्ये घेण्यात आला.

ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वांना मोफत शुद्ध पाणी मिळावे या हेतूने वाशिंबे ग्रामपंचायत ने हा निर्णय घेतला असून मोफत शुद्ध पाणी देण्याचा बहुमान वाशिंबे ग्रामपंचायतीने मिळवला आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील इतर

ग्रामपंचायतींसमोर वाशिंबे ग्रामपंचायतीने एक आदर्श निर्माण केला आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांकडून वाशिंबे ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. तसेच पुढील काळात आरोग्य, रस्ते, शिक्षण, वीज, पाणी पुरवठा अशा विविध समस्यावंर

ग्रामपंचायती कडून ठोस पावले उचलून नागरीकांच्या हीताचे निर्णय घेतले जातील असे ग्रामपंचायत वाशिंबे यांच्या कडून सांगण्यात आले.

