
करमाळा प्रतिनिधी
आज 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये विद्या विकास मंडळाचे आधारस्तंभ विलासरावजी घुमरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विविध विभागातील

यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे स्पोर्ट विभागाचे प्रमुख डॉ. मोहन अमृळे, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन

संभाजी किर्दाक, लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड, वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एन.सी.सी. कॅडेट व एन.एस.एस. स्वयंसेवक, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


