करमाळा प्रतिनिधी

येथील जि.प.प्रा. शाळेतील ध्वजा रोहणाचा मान विद्यमान सरपंच शरद नाथसाहेब भोसले यांनी गावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र वसंत गलांडे (ACP) व माजी सैनिक प्रमोद सुभाष भोसले, अरुण गणपत गोडगे, भरत गणपत गोडगे यांना

देण्यात आला व ग्रामपंचायत येथील ध्वजा रोहणाचा मान गावचे विद्यमान उपसरपंच अॅड. श्रीराम कांतीलाल गलांडे यांनी माजी सैनिक नाथसाहेब शंकर गलांडे यांना देण्यात आला. तसेच गावातील माजी सैनिक ज्ञानेश्वर शहाजी गलांडे, नाथसाहेब

शंकर गलांडे, भारत गणपत गलांडे, अरुण गणपत गोडगे, प्रमोद सुभाष भोसले, बजरंग किसन गलांडे, कांताबाई शिवाजी शिंदे, अलका कांतीलाल गलांडे, वत्सला हरिभाऊ गलांडे व निवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र वसंत गलांडे यांचा सत्कार करण्यात

आला. तसेच शासकिय योजने प्रमाणे शिला फलकाचे अनावरण माजी सैनिक अरुण गणपत गोडगे यांचे हस्ते करण्यात आले व शिष्यवृत्ती मिळालेली विद्यार्थिनी ऋतुजा सागर गोडसे आणि तिच्या आजी चा सत्कार करण्यात आला. तसेच संजय

भानुदास भोसले व संतोष भानुदास भोसले यांनी कोंढार चिंचोली प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप करून सायकल बँकेची स्थापना करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कोंढार चिंचोली तर्फे जि.प. प्राथमिक शाळेला

विद्यार्थ्याच्या डिजिटल शिक्षणा करिता २ स्मार्ट टी.वी. प्रदान करण्यात आले व चार खोल्यांचे इलेक्ट्रिक फिटींग करण्यात आले. तसेच निवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र वसंत गलांडे यांनी विद्यार्थी ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग यांना मार्गदर्शन केले. ७७ व्या स्वतंत्र दिनानिमित्त शाळेमधील विद्यार्थी, शिक्षक वृंद, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *