करमाळा प्रतिनिधी
आज दिं. ८ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकात्मिक बाल विकास प्रकल्प करमाळा अंतर्गत पर्यवेक्षिका आतकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर येथे बाजार तळ सभागृहात स्तनपान सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतिताई नारायण आबा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. १ आॅगस्ट ते ८ आॅगस्ट पर्यंत स्तनपान सप्ताह कार्यक्रम सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा राबवून व गरोदर माता, स्तनदा माता
यांना जास्तीत जास्त माहिती व आरोग्य विषयक काळजी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाते. या कार्यक्रमात महिलांनी व किशोरवयीन मुलींच्या रांगोळी, मेंहदी असे अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या वेळी विजेत्या
महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात पर्यवेक्षिका आतकर मॅडम यांनी गरोदरपणात व स्तनदा माता यांना आपल्या बाळाला स्तनपान कसे करावे व त्यांचा आहार कसा असावा असे अनेक
विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती मार्गदर्शन केले. तसेच ज्योतिताई पाटील यांनी अंगणवाडी च्या माध्यमातून सर्व सेविका, मदतनीस या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व महिलांना माहिती पोहचवता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक महिलांना
मार्गदर्शन मिळते व त्याचा फायदा अनेक मातांना होतो असे त्या म्हणाल्या, त्यानंतर मेहता मॅडम यांनी ही बालसंगोपन माहिती व सुंदर असे एक कविता म्हणून आपले विचार मांडले, तसेच रोकडे मॅडम व मेहेत्रे सर यांनी आपल्या जिवनातील धावपळ सुरू असणाऱ्या या मनावर असलेले ताण तणाव कमी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर ज्योतिताई पाटील, आतकर मॅडम मेहता मॅडम, रोकडे मॅडम, जगताप मॅडम, माळी मॅडम, मेहेत्रे सर, माने सर, माळी गुरुजी होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका मंगल दामले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अंगणवाडी सेविका आशा चांदणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व इतर महिला उपस्थित राहून कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाला.