
आदिनाथ सह. साखर कारखाना प्रशासक उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस करणार हायकोर्टात याचिका दाखल
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सह. साखर कारखाना प्रशासक उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस करणार हायकोर्टात याचिका दाखल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील व जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख यांनी दिली. वास्तविक पहाता जर तुम्हाला प्रशासन नेमायचं होतं तर मकाई सह. साखर कारखाना वरती नेमायचं होतं. आदिनाथ वरतीच

का नेमलं? करमाळा तालुक्यातील शेतकर्यांचे मंदिर म्हणजे आदिनाथ सह साखर कारखाना परंतु या कारखाण्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या कडे गेल्या मुळे आज या कारखान्याची दैनी अवस्था झाली आहे. या मध्ये हा कारखाना बारामती अँग्रो ला भाडेतत्वावर देण्यासाठी करार झाला होता परंतु काही राक्षसी राजकीय इच्छा शक्ती असणार्या लोकांनी आदिनाथ बचावचा

नारा दिला व बचाव समिती स्थापन केली पवारांच्या बद्दल भोळ्या भाबड्या शेतकर्यांच्या मनात विष पेरण्याचे काम केले, शेतकऱ्यांनी यांच्या वरती विश्वास ठेवला. लोकवर्गणीतून कारखाना चालू करू म्हणून आव्हान केले. आदिनाथ बाबतीत खोटा पुळका आणला आणि स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम केलं वाघाच्या सावलीतून काढून लांडग्याच्या घशात घालण्याचा

डाव आखला गेला आणि प्रशासक आणून त्यांच्या नावाखाली तो त्यांचा डाव कुठेतरी यशस्वी करण्याचा प्रयत्न चालू आहे हे सगळं चालू आसताना तालुक्यातील पुढारी मात्र ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या भूमिकेत आहेत ज्या कर्मवीर गोविंद बापू पाटील यांनी कारखाना उभारणी वेळी शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन जोपर्यंत साखर बाहेर पडत नाही तोपर्यंत चप्पल न

घालण्याची शप्पथ घेतली होती. त्याग केला आम्ही देखील बापूंच्या विचारांचे वारसदार आहोत आम्ही हा डाव यांचा साध्य होऊन देणार नाही. दृदैव्य आहे आज तालुक्यातील एकही पुढारी बोलत नाही. याचिका दाखल करून निवडणूक लावावी हि यांची भूमिका नाही यांना फक्त स्वतःला विधानसभेची खुर्ची कशी मिळेल या तयारी मध्ये हे आहेत परंतु तिकीट कोणी जरी

दिले तरी मत मागायला मात्र शेतकर्यांच्या दारातच जायचं आहे ना त्या वेळी शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही,. आता आदिनाथ सह. साखर कारखाना वाचवण्यासाठी हि लढाई आम्हाला धनाजी संताजी सारखी नेतृत्वाविना लढावी लागणार आहे आणि आम्ही ती लढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे मत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील व जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.