
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे नेतृत्वाखाली आदिनाथ ला वैभव प्राप्त करून देणार – महेश चिवटे, संजय गुटाळ
करमाळा प्रतिनिधी
प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी स्वतः 12 कोटी रुपयांची गुंतवणूक करून आदिनाथ कारखाना खाजगीकरण होण्यापासून वाचवला आता तो सहकार तत्त्वावर चांगल्या पद्धतीने चालत आहे. येणाऱ्या काळात सुद्धा इथूनच सारखा प्रकल्प उभा करून आदिनाथला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा आदिनाथ कारखान्याची नूतन प्रशासक महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

आज सोनारी येथे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते चिवटे व गुटाळ यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी केलेल्या मदतीमुळे गतवर्षीचा आदिनाथ हंगाम यशस्वी झाला होता.

यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, यावर्षी किमान पाच लाख टन ऊस गाळपाची नियोजन करण्याचे धोरण ठेवून सर्व कर्जांची एकत्रित करून एकाच बँकेचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला इथेनॉल प्रकल्प निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने हमी पत्र द्यावे यासाठी मागणी करून इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना असून हा कारखाना प्रगतीपथावर नेणे यासाठी जे जे काही गोष्टी करावे लागतील त्या करणारा असून या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत कोणतीही अडचण येऊ देणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.

या निवडीनंतर आरोग्य मंत्री सावंत यांच्या हस्ते चिवटे व गुटाळ यांचा सत्कार करण्यात आला. सर्व गटातटातील पक्षातील व आदिनाथ कारखान्याच्या ऊस सभासदांना कारखान्यातील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कारभार करणार असून प्रत्येक निर्णय हा सर्व सभासदांच्या साक्षीने घेणार असल्याचा विश्वास महेश चिवटे यांनी व्यक्त केला.
