पोफळज गावातील युवकांनी केला टॅकरने मोफत पाणी पुरवठा सुरू

करमाळा प्रतिनिधी

उन्हाची दाहकता प्रचंड प्रमाणात असल्याने पोफळज ता. करमाळा येथे पाण्यासाठी महिला, मुलांना हातपंपावर, तसेच नजिकच्या मळ्यात जावे लागत होते म्हणून गावातील युवकांनी विशेष पुढाकार घेऊन टॅकरने मोफत पाणी पुरवठा हा

कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे. मागेल त्याला पाणी आपल्या दारातच अशी संकल्पना सामाजिक कार्यकर्ते अरूण काका पवार, ग्रामपंचायत सदस्य बिभिषन पवार, संतोष भास्कर पवार, ग्रामपंचायत सदस्य नाना गोळे आणि भीम आर्मी संविधान

रक्षक दलाचे उत्तरेश्वर कांबळे आदींची वारकरी संप्रदायाचे पांडुरंग पवार यांच्या हस्ते पहिल्या टॅकरचे पुजन करण्यात आले. यावेळी गावातील शिवाजी पवार,जीवन पवार, दिगंबर पवार,शिवाजी क्षीरसागर, सुखदेव गरड, हरिश्चंद्र पवार,गणपत पवार,

शिवाजी निंबाळकर,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जोपर्यंत मोठा पाऊस पडत नाही व नळाला पाणी येत नाही तोपर्यंत हा मोफत पाण्याचा टॅकर सुरूच राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *