
करमाळा प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भारतीय स्टेट बँकेत स्केल वन अधिकारीपदी निवड झालेल्या वांगी येथील स्नेहल देशमुख हिचा शेटफळ तालुका करमाळा येथील जिव्हाळा ग्रुप व जिजामाता शेतकरी गटाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य सोनाली तकीक उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आई-वडिलांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवलेल्या मुलीचा आई-वडिलांनाच नाही तर समाजातील सर्वच घटकांना अभिमान वाटतो असेच स्नेहलच्या यशामुळे जिल्हा परिषद शाळेत शिकलेले विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कुठेच मागे राहत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. सत्काराला उत्तर देताना स्नेहलने सांगितले की, या यशासाठी मी घेतलेले कष्ट, आई-वडिलांचा विश्वास, त्यांनी वेळोवेळी दिलेलं प्रोत्साहन व सर्व कुटुंबाचे नातेवाईकांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे माझ्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला यामुळे यशाचा मार्ग सुकर झाला. यावेळी जिजामाता शेतकरी गटाचे अध्यक्ष हर्षाली नाईकनवरे, जान्हवी पोळ यांची भाषणे झाली. यावेळी इंजिनीयरींग सीईटी परीक्षेत यश मिळवल्याबद्ल ऋतुराज नाईकनवरे व महाधन ॲग्रोमध्ये निवडीबद्दल शुभम देशमुख यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार प्रशांत नाईकनवरे यांनी मानले. या कार्यक्रमाला लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ, साहेबराव पोळ, नानासाहेब साळुंके,राजेंद्र साबळे, महावीर निंबाळकर, गंगाधर पोळ, मंदाकिनी साळुंके, गंगाताई लबडे, नीता पोळ, राणी पोळ, वैशाली देशमुख, प्रतिभा पोळ, अहिल्याबाई पोळ, सुमन पोळ, लक्ष्मी पोळ, सुषमा पोळ, रूपाली साबळे, अपर्णा वळेकर, सुनंदा तकीक, शकुंतला स्मिता पोळ त्यांच्यासह महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.