
मांगी तलावाचा समावेश कुकडी लाभ क्षेत्रात झाल्यास भाजपच्या पाठीशी उत्तर भाग खंबीर पणे उभा राहील – किरण बागल
करमाळा प्रतिनिधी
मांगी तलावाचा समावेश कुकडी लाभ क्षेत्रात झाल्यास भाजपच्या पाठीशी उत्तर भाग खंबीर पणे उभा राहील, अशी माहिती मांगी येथील शेतकरी किरण बागल यांनी दिली आहे. बागल म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रणजीतसिंह निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या सहकार्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असेल तर उत्तर भागातील सर्व शेतकरी बांधव त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे.

मांगी तलावावर आज 22 गावातील शेती अवलंबून आहे तसेच 13 गावच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. मांगी तलावात फक्त कर्जत तालुक्यातील पाणी येते. कर्जत तालुक्यातील नद्या, ओढ्यावर अनेक बंधारे, मातीनाले झाल्याने मांगी तलावात पावसाचे पाणी येत नाही, परिणामी वर्षानुवर्षे तलाव कोरडा राहतो. यामुळे याचा प्रतिकुल परिणाम तलावावर

अवलंबून असणाऱ्या शेती व पाणी पुरवठा योजनावर होतो. यामुळे मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट होणे गरजेचे आहे. हि लोकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रमुख मागणी आहे व मूलभूत गरज आहे. आज राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या सहकार्याने आपण हा प्रश्न सोडवून घेणार आहोत. याबद्दल उपमुख्यमंत्री,

खासदारांनी सकारात्मक अनुकूलता दर्शवली आहे. मांगी लाभक्षेत्रातील गावामध्ये अध्यक्ष चिवटे आम्ही स्वतः गेल्या सात आठ दिवसापासून बैठका घेत आहे. या लढ्यात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. त्यामुळे मांगी लाभक्षेत्रातील इतर लोकांनीही राजकीय जोडे बाजूला ठेऊन या पाणीप्रश्नाच्या लढ्यात सामील व्हावे, आमच्या परिवारातील पन्नास एकर जमीन

ओलिता खाली येईल असे किती तरी क्षेत्रात ओलिता खाली आले की पाच ते सहा हजार कुटुंबाचे कल्याण होईल, मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट होणे गरजेचे आहे. मांगी गावासह लाभक्षेत्रातील सर्व गावातून या लढ्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. वरील नेते मंडळी या प्रश्नाकडे सकारात्मकपणे पाहून प्रश्न सोडवेल अशी अपेक्षा अखेर किरण बागल यांनी व्यक्त केली.
