
कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाची शिवांजली राऊत सोलापूर जिल्ह्यात प्रथम गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट यंदा झालेल्या दहावी बोर्डाच्या परिक्षेत करमाळा शहरातील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचा निकाल 92.11% इतका लागला असुन विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी राऊत शिवांजली महेश हिने

99.40% गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. सोलापूर जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान प्रथमच करमाळा तालुक्याला मिळाला आहे त्याचप्रमाणे विद्यालयात प्रथम पाच क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे.

प्रथम क्र. राऊत शिवांजली महेश 99.40%
द्वितीय क्र. शिंदे पायल ज्योतिराम 95.00%
तृतीय क्र. क्षिरसागर श्रावणी प्रकाश 94.80
चतुर्थ क्र. फंड सुचिता महादेव 94.60%
पाचवा क्र. क्षिरसागर सानिका गणेश 93.80%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच समाजसेवा मित्र मंडळाचे सचिव गुलाबराव बागल सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन प्रोत्साहित केले. प्रकृती अस्वास्थ्य असल्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ

शकले नाही तरी सदरहू विद्यार्थ्यांचा मोठा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात येईल असे संस्थेने जाहीर केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षवृंद व पालक उपस्थित होते.
