महापारेषणचे वरीष्ठ तंत्रज्ञ झोळ यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान सोहळा

प्रतिनिधी वाशिंबे

वाशिंबे ता. करमाळा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीतील वरीष्ठ तंत्रज्ञ विलास विठ्ठल झोळ यांच्या सेवापूर्ती निमित्त जोतिर्लिंग कार्यालय (कुंभेज फाटा) येथे शुक्रवार २ जुन रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारेषण कंपनीचे कार्यकारी अभियंता विवेक लबडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण कंपनी जेऊर येथील अधिकारी उपस्थिती होते.

यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली झोळ महाराज यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना वरीष्ठ तंत्रज्ञ विलास झोळ यांनी खडतर परिश्रमातून केलेल्या वाटचालीला ऊजाळा देत ३१ वर्ष केलेल्या निस्वार्थी सेवेबद्दल गौरवउद्गार काढले.

यावेळी डाँ.संजय साळुंखे, डाँ.अरुण जाधव,आदिनाथ सहकारी साखर कारखाना मा. संचालक नवनाथ झोळ,श्रीकांत साखरे,गणेश झोळ यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वाशिंबे ग्रामपंचायत सरपंच तानाजी झोळ,मा.उपसभापती नितीन जगदाळे,मारुती पाटील,राजाभाऊ पाटील,मनोहर झोळ,भानुदास टापरे,कल्याण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले.तर आभार सतिश झोळ यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *