
नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश
करमाळा – वैभवराजे जगताप यांनी शुक्रवारी मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वैभव राजे यांच्यात प्रवेशाआधी तब्बल चाळीस मिनिटे बंद खोलीत

चर्चा झाली.वैभवराजेंच्या प्रवेशाने करमाळ्यात शिवसेनेला एक आश्वासक नेतृत्व मिळाल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वानुसार काम करुन येत्या काळात शिवसेनेचे काम प्रामाणिकपणे करुन पक्ष विस्तार करणार असल्याचे यावेळेस वैभव राजे जगताप

म्हणाले.यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई, युवासेनेचे वरुण सरदेसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी,बाळासाहेब कांबळे,गणेश कुकडे,शाहबाज घोडके,राम काळे यांच्यासह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
