
तानाजी झोळ यांना आमदार झाल्यासारखं वाटतय म्हणून वाशिंबे गावातील विकासकामांना खोडा घालत आहे – अध्यक्ष गफुरभई शेख
करमाळा प्रतिनिधी
वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ हे आमदारांच्या गाडीत बसत्यात यांना आमदार झाल्या सारखे वाटत आहे. गावातील विविध

विकासकामे अडवित आहे प्रा. रामदास झोळ स्व :ता खर्च करून विकासाचे कामे करित आहे. ते कामे करून देत नाही त्याला खोडा घालत आहे असे काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष गफुरभई शेख यांनी सांगितले.
वाशिंबे,ता.करमाळा या गाव व परिसर मध्ये बरेच लोकवस्ती,स्मशानभूमी,मंदिरे,शाळा या ठिकाणी लाईटची सोय नव्हती व त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत होती.त्यासाठी,ग्रामस्थानी प्रा.रामदास झोळ यांच्याकडे मागणी केली व प्रा.झोळ सर यांनी प्रा.रामदास झोळ फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवाजी अप्पा झोळ वस्ती,ज्योतिबा मंदिर,स्मशानभूमी,ग्रामदैवत भैरवनाथ

मंदिर,रेल्वे बोकदा,म्हसोबा मंदिर, सोगाव, टापरे चौक, चव्हाण वस्ती,सुतार गल्ली या वर्दळीच्या ठिकाणी लाईटची सोय नव्हती.त्याठिकाणी १०० डब्लू चे सोलार बल्ब पोल सहित बसवून देऊन ती गैरसोय ग्रामस्थांची दूर करून देण्यात आली व त्याच प्रकारे भैरवनाथ मंदिर,झोळ वस्ती,पवार वस्ती,शिंदे वस्ती,देवी मंदिर,गणेश झोळ वस्ती,गायकवाड वस्ती,गुरव वस्ती,ज्योतिबा मंदिर या ठिकाणी बसण्यासाठी ४० बाकड्यांची व्यवस्था प्रा.रामदास झोळ फाऊंडेशन मार्फत करण्यात आली.
वाशिंबे गाव व परिसर या ठिकाणी येथून मागे देखील ग्रामस्थांच्या मागणीनुसार विविध समाजपयोगी कामे या फाऊंडेशन च्या माध्यमातून करण्यात आली आहे.त्यामध्ये,सोलर दिवे बसविणे,कॉर्नर मिरर बसविणे, वृध्दांना बसण्यासाठी बाकड्याची सोय करणे,वृक्षारोपण,रस्त्यासाठी आर्थिक मदत करणे, ई श्रम कार्ड काढण्याबाबत शिबिर आयोजन करणे,तुळजापूर व

पंढरपूर या ठिकाणी जाण्यासाठी बसची सोय करणे अश्या प्रकारची कामे या फाऊंडेशन च्या माध्यमातून करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला आहे व येथून पुढे देखील फाऊंडेशन च्या माध्यमातून वाशिंबे व परिसर या ठिकाणी मदत ते करित आहे परंतु तानाजी झोळ ग्रामपंचायत मार्फत नाहरकत दाखला काही ठिकाणी देऊ देत नाही तसेच बाकडे तोडणे दिवे फोडणे आदी गावातील नुकसान चुपके चुपके करित आहे राजकारणाच्या वेळेस राजकारण केले तर चालेल पण विकासकामात राजकारण नको असा आरोप काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष गफुरभई शेख यांनी त्यांच्यावर केला आहे.

……
यासंदर्भात तानाजी झोळ यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी यांना फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही.