कंदर केम रोपळे व केम मलवडी निंभोरे मार्ग करमाळा या दोन्ही रस्त्याची दुरावस्था झाली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी. प्रहार संघटना आक्रमक….. प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर

केम प्रतिनिधी

केम कंदर रोपळे व केम मलवडी मार्गे निंभोरे रस्त्यावर प्रहार संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांना रस्त्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानंतर कार्यकारी अभियंता व उपविभाग करमाळा यांनी मिळून या रस्त्याची इस्टिमेट तयार केले व टेंडर केम कंदर रस्त्यातील करमाळ्यातील आर. जे. पाटील यांनी घेतले व

केम मलवडी निंभोरे मार्गे या रस्त्याचे टेंडर कर्जत येथील बाळासाहेब शिंदे कॉन्टॅक्टर त्यांना मिळाले पण या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरने या दोन्ही रस्त्याची कामे दोन चार दिवस फक्त त्यांनी काम करून  मुरूम टाकून अधिकाराचे डोळे पुसण्याचे काम करून बिले ही 70 टक्के काढले आहेत. ज्याप्रमाणे इस्टिमेट आहे त्याप्रमाणे खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही. तरी

आपण संबंधित कॉन्ट्रॅक्टरला लवकरात लवकर इस्टिमेट प्रमाणे खड्डे बुजवण्याचे काम साईट पट्टी व साईट पट्टीच्या बाजूला असणारे रस्त्यावरील झाडे काढण्याचे काम चालू करावे. या रस्त्यावरून ऊस वाहतुकी मोठ्या प्रमाणात होत आहे अनेक वाहने तरकारी माल बाजारात जाण्यासाठी वाहत आहेत. खड्डेही मोठे पडले आहेत त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता

असल्यामुळे व केम कंदर रोपळे व केम मलवडी निंभोरे करमाळा या रस्त्यावरील येणाऱ्या सर्व गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात या रोडवरून येताना जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यासाठी लोकनायक प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू यांनी या रस्त्यासाठी स्वतःहून पत्र दिले आहे. या रस्त्यावर अनेक एक्सीडेंट झाले

आहेत व गाडी घसरून रात्रीच्या वेळेस अनेक लोक गाडीवरून पडले आहेत. इथून पुढे जर असा प्रकार घडल्यास या रस्त्याचे संबंधित कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावर मनुष्यबाळाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीच्या अनुषंगाने रोड आठ दिवसांमध्ये इस्टिमेट प्रमाणे शंभर टक्के दुरुस्त न चालू केल्यास संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पुढील बिले देऊ नये त्यांना पुढील कामासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना यांच्यावतीने प्रहार स्टाईलने रस्ता रोको ठीया आंदोलन करण्यात येईल प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *