
उजनी जलाशयातून सोडलेले पाणी ताबडतोब बंद करावे – महेंद्र पाटील
करमाळा प्रतिनिधी
उजनी जलाशयातून सोडलेले पाणी ताबडतोब बंद करावे अशी मागणी महेंद्र पाटील यांनी केली आहे.
ते म्हणाले की, अन्यथा जागतिक हवामान खाते तसेच उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर्षी अलनिनोचा प्रादुरभाव असल्याकारणाने खूप मोठा दुष्काळ पडू शकतो, असे जाहीर केलेले आहे. परंतु आपले प्रशासन तसेच उजनी धरण व्यवस्थापन विभागाने पुढील

वर्षी दुष्काळ पडणार असल्यास भविष्यात पाणी पिण्याचे तसेच शेती व औद्योगिकरणाचे पुढील वर्षाचे पाण्याचे कसलेही नियोजन केले नाही.
भविष्यात अलनिनोचा प्रादुरभाव झाल्यास दुष्काळ पडल्यास तुम्ही जलाशयातील संपूर्ण शेतीचा व पिण्याच्या पाण्याच्या योजना मायनस 45 ते 55 पर्यंत सर्व योजना बंद होतात. सध्या उजनीत सोडलेले पाणी 6000 क्युसेक्सने सोडलेले आहे.

सोडलेले पाणी ताबडतोब बंद न केल्यास उजनी मायनस 30 ते 35% पर्यंत जाईल. पुढील 20 ते 30 दिवस उजनी जलाशयात पाणी पुरेल. पुढील वर्षी मात्र शेतकरी व पिण्याच्या पाणीपुरवठा योजना बंद पडतील. त्यामुळे अलनिनोचा प्रादुरभाव पाहता नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे तरी नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या खाली पाणी मागण्याचे एवढे मागणी नसताना सुद्धा

पाण्याचा वायफळ वापर होत आहे. तरी या सर्व गोष्टीचा विचार करता चालू केलेले पाणी ताबडतोब बंद करावे. तसेच पुढील वर्षाचे सुद्धा पाण्याचे नियोजन करावे.असे अखेर महेंद्र पाटील यांनी सांगितले आहे
