अहमदनगरचे अहिल्यानगर नामकरण करण्यात यावे  – अण्णासाहेब सुपनवर

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे रोजी जयंती च्या अगोदर अहमदनगरचे अहिल्यानगर नामकरण करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म चोंडी गावी झाला शिंदे घराण्याची राजकन्या होळकर  घराण्याची सून झाली राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राजकारभार 29 वर्ष या हिंदुस्तानावरती केला पुण्यश्लोक ही पदवी फक्त अहिल्यादेवी होळकर यांनाच बहाल करण्यात आली. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी रामेश्वर चे काश्मीर

पर्यंत शिव मंदिरांचा व हिंदू देवतांच्या मुस्लिम मशिदींचा जीर्णोद्धार केला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विहिरी घाट बांधले, गोरगरिबांना जमिनी कसायला दिल्या, चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या दरोडेखोरांना शासनाच्या जमिनी विना मोबदला कसायला दिल्या, गोरगरिबांचे कल्याण कार्य राज्य व आदर्श कारभार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला

31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अगोदर अहमदनगरचे अहिल्यानगर नामकरण करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र मधून होत आहे अहिल्यादेवींच्या कार्याचे दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय

ताबडतोब घ्यावा. यावेळी दादासाहेब महानवर, विठ्ठल शिंदे, बाळासाहेब भिसे, लाला हुलगे, तात्या काळे, किरण पाटील, भाऊसाहेब खरात, दादासाहेब येडे, बाळासाहेब बेरे, बापू पाटील आधी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *