
कुंभेज ग्रामस्थांनी दिला रास्तारोकोचा इशारा
प्रतिनिधी कुंभेज
तालुका करमाळा येथील ग्रामस्थांनी कमी दाबाने मिळणारी विज व दोन तास मिळणारी विज यांना वैतागून कुंभेज फाटा येथे शुक्रवारी सकाळी 12तारखेला सकाळी 8 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

कमी दाबाने मिळणारी विज यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.मुक्या जनावरांना पाणी मिळत नसल्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत.विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.विजवितरण कंपनीच्या

अधिकाऱ्यांना वारंवार भेटून तक्रारी करण्यात आल्या होत्या .पण अधिकारी शेतकऱ्यांना टाळाटाळ करीत होते.त्यामुळे कुंभेज ग्रामस्थांनी विजवितरण घ्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

या रास्तारोको आंदोलनाचे निवेदन तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यात,व जेऊर येथील एम.एस ई. बी कार्यालयात कुंभेज ग्रामपंचायत चे उपसरपंच संजय तोरमल, दत्तू शिंदे, चेअरमन युवराज भोसले, सोमनाथ माने ,सचिन सातव, इन्नुस

पठाण,बिंटूतोरमल, अमोल मुटके सर , जयदीप शिंदे,किरण झोळ, आदी मान्यवर उपस्थित होते

