त्वरित प्रत्येक वाहकांना नवीन मशीन देण्यात याव्यात

करमाळा प्रतिनिधी,

सध्या लगीन सराई व सुट्ट्यांचे दिवस आहेत करमळा आगारातील वाहना बाबत तिकीट देणाऱ्या मशीन मध्ये वारंवार होणारा तांत्रिक बिघाड यामुळे वाहकांना तिकीट देण्यामध्ये वेळ जात आहे.

 तरी त्वरित प्रत्येक वाहकांना नवीन मशीन देण्यात याव्यात अशी मागणी भाजपाच्या वतीने तालुका सरचिटणीस श्याम सिंधी यांनी विभाग नियंत्रक सोलापूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र, फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.

करमाळा आगारा मधील दुरुस्तीसाठी सोलापूर येथे पाठवण्यात आलेल्या  मशीन यामुळे मशीनची टंचाई जाणवत आहे नवीन मशीन येईपर्यंत दुरुस्तीला पाठवण्यात आलेल्या मशीनच्या मोबदल्यात लवकरात लवकर मशीन उपलब्ध करून द्याव्यात वाहकांना बुकिंग साठी वेळ जात आहे. हा वेळ वाचवण्यासाठी व  प्रवाशांचा प्रवास  सुखकर होण्यासाठी लवकरात लवकर

अद्यावत मशीन उपलब्ध करून द्याव्यात तसेच करमाळा आगारामध्ये साधारणता 85 गाड्या पैकी साधारणतः चाळीस गाड्या सुस्थितीत आहेत इतर गाड्यांना काही ना काही तांत्रिक बिघाड होत राहतात यामुळे  वाहतूक मार्गावर या गाड्या वेळोवेळी बंद पडतात याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच करमाळा आगारासाठी गेली अनेक वर्षापासून नवीन बस देण्यात

आलेले नाहीत नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात तसेच स्पीड लॉक मुळे प्रवाशांना प्रचंड विलंब होत आहे स्पीड लॉक काढण्यात यावेत स्पीड लॉक मुळे प्रवासी इतर आगारांच्या गाड्यांना प्राधान्य देत आहे करमाळा आगाराचे उत्पन्न जिल्ह्यामध्ये चांगले आहे याबाबत लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलावीत अशी मागणी तालुका सरचिटणीस शाम सिंधी ,भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे, संजय गांधी निराधारेचे

 नरेंद्रसिंह ठाकुर यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *